Vidhan Sabha Election Superfast News : विधानसभा निवडणुकीच्या सुपरफास्ट बातम्या : 12 Aug 2024
Vidhan Sabha Election Superfast News : विधानसभा निवडणुकीच्या सुपरफास्ट बातम्या : 12 Aug 2024
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपात तिकीट वाटपाचे सर्वाधिकार फडणवीसांकडे असणार, काल झालेल्या भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय, आशिष शेलार यांची माहिती.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबत मत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती.
२० ऑगस्टला महायुतीचं जागावाटप जाहीर होण्याची शक्यता, उदय सामंत यांची माहिती, कोल्हापुरातील अंबाबाईच्या दर्शनानंतर जाहीर होणार जागावाटपाचा फॉर्म्युला.
भाजपा प्रभारी भूपेंद्र यादव विधानसभा निवडणुकीसाठी अॅक्शन मोडवर, भूपेंद्र यादव यांच्याकडून भाजपाच्या विभागनिहाय मॅरेथॉन बैठका.
फडणवीसांच्या विरोधात लढण्यास काँग्रेसमधून अनेक जण इच्छूक, तर नागपुरातील ६ मतदारसंघांसाठी 71 इच्छूकांनी काँग्रेस पक्षाकडे अर्ज केला, विकास ठाकरेंची माहिती.
अजित पवारांनी माजी आमदार आसिफ यांची भेट घेतली, त्यामुळे आसिफ शेख मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार असणार का अशा चर्चांना उधाण.