एक्स्प्लोर

Vasai Girl Murder News : लोखंडी पान्याने वार करत एक्स बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला संपवलं

Mumbai Vasai Virar Crime : भर रस्त्यात एका प्रियकराने आपल्या प्रेयसीवर लोखंडी पान्याने वार करून हत्या केली. वसई पूर्वेच्या (Vasai News) गावराई पाडा येथे मंगळवारी सकाळी ही घटना घडली. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरच बसून होता. त्याला वालीव पोलिसांनी (Police) अटक केली आहे. आरोपीचं नाव रोहित यादव असल्याचं समोर आलेय. या प्रकरणामुळे मुंबईसह (Mumbai News) उपनगरात एकच खळबळ उडाली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी याप्रकरणाची दखल घेत सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. तर विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

गावराई पाडा येथे सकाळी रोहितने आपल्या एक्स गर्ल्डफ्रेंडवर लोखंडी पान्याने वार केले. एकदा नाही तर तब्बल 15 वेळा त्यानं तिच्यावर हल्ला केला. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती, त्यामधील एकही व्यक्ती मदतीसाठी पुढे आला नाही, फक्त पाहात राहिले किंवा व्हिडीओ काढत राहिलेय. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रत्येकाला राग अनावर झाला. तरुणीवर हल्ला करणाऱ्याला माणूस म्हणावं की हैवान? असा प्रश्न उपस्थित झालाय. 

सपासप वार केल्यानंतर मृतदेहाला जाब विचारत होता - 

रोहितच्या मानगुटीवर संशयाचं भूत, मस्तकात राग आणि हातात लोखंडी पाना...जिच्यावर रोहित यादवनं प्रेम केलं, त्याच आरती यादवची दिवसाढवळ्या भररस्त्यात निर्घृणपणे हत्या केली. वसई पूर्वच्या चिंचपाडा परिसरातली सकाळी साडेआठ वाजता रोहितने डाव साधत आरतीवर हल्ला केला. आरती कामाला निघाली होती. पाठलाग करणाऱ्या रोहितनं आधी आरतीला जमिनीवर पाडलं.. मग तिच्यावर लोखंडी पान्याने एकामागे एक 15 वेळा हल्ला केला. हे सगळं घडत असताना बरीच गर्दी जमा झाली. एक जण रोहितला रोखण्यासाठी पुढे आला. पण रोहितने त्याच्यावर देखील पाना उगारल्याने तो मागे सरला. आरती निपचीत पडली. तीने प्राण सोडले होते. मात्र रोहितमधला हैवान शांत झाला नाही. क्यूं किया क्यूं किया... असे म्हणत तो आरतीच्या मृतदेहाला जाब विचारत होता. या सर्व घटनेनंतर काही तासांतच पोलिसांनी रोहित यादवा अटक केली. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Maharashtra Superfast News : 12 December 2024 : सुपरफास्ट बातम्या : ABP Majha
Maharashtra Superfast News : 12 December 2024 : सुपरफास्ट बातम्या : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत-जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत-जनजीवन पूर्ववत 
Places Of Worship Act : तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
India vs Australia : टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : 12 December 2024 : सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaSharad Pawar Meet Ajit Pawar : पवारांचा वाढदिवस, अजितदादा भेटीला; सुप्रिया सुळेंनी केलं स्वागतABP Majha Headlines : 05 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सOne Nation One Election : वन नेशन वन इलेक्शन कशी होणार? काय आवश्यक?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत-जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत-जनजीवन पूर्ववत 
Places Of Worship Act : तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
लातूरनंतर औसामधील शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस; 175 एकर जमिनीवर केलाय दावा
India vs Australia : टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जर तरच्या गणितामध्ये अडकली असतानाच आणखी एक बॅड न्यूज धडकली!
साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, बारबालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल; मारहाणीत 3 जखमी
साताऱ्यात रेव्ह पार्टीत राडा, बारबालांसह अश्लील डान्सचे व्हिडिओ व्हायरल; मारहाणीत 3 जखमी
राज्यात 'अखंड' राष्ट्रवादीचा प्रयोग होणार का? शरद पवार-अजितदादांच्या भेटीनंतर चर्चा
राज्यात 'अखंड' राष्ट्रवादीचा प्रयोग होणार का? शरद पवार-अजितदादांच्या भेटीनंतर चर्चा
झुकेगा नहीं साला! विधानसभेतील पराभवानंतर शरद पवारांच्या नेत्याची 'पुष्पा'स्टाईल डायलॉगबाजी, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
झुकेगा नहीं साला! विधानसभेतील पराभवानंतर शरद पवारांच्या नेत्याची 'पुष्पा'स्टाईल डायलॉगबाजी, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
Yuvraj Singh Video : अवघ्या 60 सेकंदात सिक्सर किंग युवराज सिंगला आयसीसीचा ग्रँड सॅल्युट!
Video : अवघ्या 60 सेकंदात सिक्सर किंग युवराज सिंगला आयसीसीचा ग्रँड सॅल्युट!
Embed widget