ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6 PM : 27 Jan 2025 : ABP Majha
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6 PM : 27 Jan 2025 : ABP Majha
विधानसभेत सुनील तटकरेंकडून सेटलमेंट, गोगावलेंचा आरोप, तर तटकरेंना रायगडमध्ये फिरकू देणार नाही, आमदार महेंद्र दळवींचा धमकीवाजा इशारा, पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला
पालकमंत्रिपदावरुन तटकरेंना टार्गेट करणाऱ्या थ्री इडियटसला आवरा.. राष्ट्रवादी प्रवक्ते सूरज चव्हाणांचं उपमुख्यमंत्री शिंदेना आवाहन..थोरात, गोगावले आणि दळवींवर निशाणा
धनंजय मुंडेंविरोधात पुरावे घेऊन अंजली दमानिया ७ वाजता अजित पवारांना भेटणार, छत्तीसचा आकडा असूनही अजित पवारांना भेटत असल्याचं दमानियांनी केलं होतं ट्विट
सरपंच देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेला ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी, मोबाईलमधून डेटा रिकव्हर करण्यात पोलिसांना यश
बीड जिल्ह्यात दहशत माजवणाऱ्या दोन गँगवर मकोका अंतर्गत कारवाई, सनी आठवले, आशिष आठवलेसारख्या आरोपींचा समावेश..
हॉटस्टारवर चॅम्पियन्स ट्रॉफिचं मराठीतून समालोचन होणार, मनसेच्या दणक्यानंतर हॉटस्टारची ग्वाही, मनसे मूळ रुपात आल्याचीही चर्चा
महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रच लढणार, स्वबळाचा नारा फक्त मुंबईपुरता, संजय राऊतांचे संकेत..