Beed Sudarshan Ghule : सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डेटा फॉरेन्सिक विभागाकडून रिकव्हर
Beed Sudarshan Ghule : सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डेटा फॉरेन्सिक विभागाकडून रिकव्हर
बीड ब्रेक संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेची पोलीस कस्टडी मिळवण्यासाठी एसआयटी कडून बीडच्या न्यायालयामध्ये अर्ज..... आरोपी सुदर्शन घुले संदर्भात काही पुरावे सापडल्यामुळे एसआयटी कडून पुन्हा सुदर्शन घुलेची पोलीस कोठडी मिळावी असा अर्ज मकोका कोर्ट विशेष न्यायाधीश सुरेखा आर पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा संतोष देशमुख यांच्या हत्याकांडांमध्ये आणि खंडणी प्रकरणांमध्ये आरोपी आहे त्याचबरोबर मकोका अंतर्गत कार्यवाही झाली आहे...... सरकारी पक्षाकडून वकील बाळासाहेब कोल्हे हे हजर राहतील तर आरोपीचे वकील तिडके असतील..... सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली होती संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामध्ये...... 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली असता त्यावेळेस पोलीस कोठडीचा अधिकार अबाधित ठेवावा असे स्पष्टपणे सांगण्यात आले होते..... गरज पडल्यास आरोपी सुदर्शन घुले सह इतर आरोपींना पोलीस कोठडी मागण्याचा अधिकार अबाधित ठेवावा असे देखील म्हटले होते सरपंच संतोष देशमुख हत्याकांड आणि मकोका कपाशी अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील बीड जिल्हा न्यायालयामध्ये हजर......