(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray vs EC : उद्धव ठाकरेंची 'ती' पत्रकार परिषद चौकशीच्या फेऱ्यात, वाद पेटणार?
उद्धव ठाकरेंची निवडणुकीच्या दिवशी[quote author=][/quote]ची पत्रकार परिषद वादाच्या भोवऱ्यात, निवडणूक आयोग अॅक्शन मोडवर, काय पावलं उचलणार याकडे लक्ष
Vidhan Parishad Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या (Nashik Division teachers Constituency) निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आजपासून उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकृती होणार आहे. 7 जूनपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. 10 जून रोजी छाननी होणार असून 12 जूनपर्यंत माघारीची मुदत आहे. निवडणुकीसाठी (Election 2024) 26 जून रोजी मतदान आणि 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर हे पाच जिल्हे मिळून शिक्षक मतदारसंघाचे कार्यक्षेत्र आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले असताना उध्दव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेचे विधान परिषद आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
किशोर दराडे शिंदे गटाच्या संपर्कात?
नाशिक विभागाचे शिवसेना ठाकरे गटाचे पुरस्कृत विद्यमान शिक्षक आमदार किशोर दराडे (Kishor Darade) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीमार्फत पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून किशोर दराडे हे महायुतीच्या अनेक कार्यक्रमात दिसून आले आहेत. त्यामुळे ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र आतापर्यंत किशोर दराडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. किशोर दराडे नेमकी काय भूमिका घेणार? ठाकरेंकडून की शिंदेंकडून ते निवडूक लढवणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.