एक्स्प्लोर
Uddhav Thackeray : 'चोरांना हद्दपार करण्यासाठी आलोय', नरक चतुर्दशीच्या दिवशी ठाकरेंचा BJP वर थेट हल्ला
नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड (Sangeeta Gaikwad) यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 'आजपर्यंत जे मत चोरी करून तिकडे बसलेत त्यांना असं वाटत होतं की त्यांची चोरी कोण पकडू शकणार नाही, पण चोरी, चोरा सकट आपण पकडलेले आहे,' असा घणाघात शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला. यावेळी बोलताना त्यांनी नरक चतुर्दशीचा संदर्भ देत विरोधकांना 'नरकासूर' संबोधले. कोणालाही हुकूमशाही नको असून, त्यासाठीच मराठी आणि अमराठी माणसे एकत्र येत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, मतदार याद्यांमधील घोळाच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी उद्धव ठाकरे येत्या २५ ऑक्टोबर रोजी मुंबईत उपशाखा प्रमुखांचा मेळावा घेणार आहेत. अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















