TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 01 जानेवारी 2024 : ABP Majha
राज्यासह देशभरात नववर्षाचा जल्लोष, राज्याचं प्रवेशद्वार असलेल्या गोंदियातील चांदसूरजमध्ये सूर्यदर्शनाने नवीन वर्षाचं स्वागत
नववर्षाचं स्वागत देवदर्शनाने करण्याचा ट्रेंड यंदाही कायम, पंढरपूर, कोल्हापूर, शिर्डीसह राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी, बहुतांश मंदिरं २४ तास खुली
न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियात नववर्षाचं दिमाखात स्वागत...ऑकलंड शहरातल्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी...दुबईतही बुर्ज खलिफाला आकर्षक रोषणाई
पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये २०७ व्या शौर्यदिनाची जय्यत तयारी, विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर, विकासकामांचं लोकार्पण आणि नवीन कामांचं भूमिपूजन, पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांसोबतही साधणार संवाद
राजकीय लाभ घेण्यासाठी मंदिरांचा वापर नको, मोहन भागवतांच्या मंदिरांबाबत वक्तव्यानंतर आरएसएसचे मुखपत्र पांचजन्यचेही बदलते सूर
नव्या वर्षामध्ये म्हाडा अडीच ते तीन हजार घरांची लॉटरी काढणार, अत्यल्प आणि अल्प गटासाठी सर्वाधिक घरं बांधण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील
सरकारला अंधारात ठेवून १३१० बस भाडेतत्वावर घेतल्याचं समोर, एसटी महामंडळाला २ हजार कोटींचा फटका, मुख्यमंत्र्यांकडून निर्णयाला स्थगिती, अप्पर सचिवांमार्फत चौकशीचे आदेश