New Year Celebration : शिर्डी, शेगाव,मुंबईतील सिद्धिवानायक; नववर्षाचं स्वागतासाठी मंदिरांमध्ये गर्दी
नववर्षाचं स्वागत करण्यासाठी मंदिरात भाविकांच्या रांगा
राज्यातल्या प्रमुख मंदिरात भाविकांच्या रांगाच रांगा
मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने नववर्षाची हजारो भाविकांनी केली सुरूवात
शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या दर्शनाने नववर्षाचं स्वागत
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी गर्दी
दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाने नववर्षाची सुरूवात
पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची गर्दी झाली आहे. नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनाने व्हावं यासाठी भाविक मंदिरात दाखल झाले आहेत.
त्रंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. पहाटे पासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून त्रंबकेश्वर नगरीत देशभरातील भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. नवीन वर्षाचा नवा संकल्प त्रंबकेश्वरच्या चरणी नतमस्तक होत केला जात आहे.
नवीन वर्षाचे स्वागत करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेऊन करण्यासाठी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांनी गर्दी केलीय...2025 हे वर्ष सर्वांना सुख समाधान आणि निरोगी राहो अशी प्रार्थना भाविकांनी देवीकडे केली... आज पहाटे पासूनच मंदिरात भाविकांची गर्दी पहायला मिळाली....