TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 डिसेंबर 2024 : ABP Majha
बीड प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीनं सुरु करा, तसंच बंदुकी सोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत त्यांचे परवाने रद्द करा, CID चे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश
बीडच्या परिस्थितीला पालकमंत्री आणि पोलीस जबाबदार, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाका, जितेंद्र आव्हाडांची धनंजय मुडेंवर टीका.
धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असेपर्यंत देशमुख हत्याप्रकरणी न्याय मिळू शकत नाही, चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांचा राजीनामा घ्यावा, आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी.
वाल्मिक कराड हा चिरकूट माणूस, सरकार आणि पोलिसांना शक्य नसेल तर आम्ही त्याला पकडून आणू, ऑल इंडिया पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांचं वक्तव्य.
सरपंच हत्येप्रकरणी दोषींवर जलद गतीने कारवाई व्हावी यासाठी गृहमंत्री काम करतायत, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती.
अंजली दमानिया बोगस आरोप करतायत, सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींची हत्या झाली तर त्यांचे मृतदेह कुठे आहेत? माहिती असेल तर दमानियांनी पोलिसांना द्यावी, संजय शिरसाट यांचं अंजली दमानियांना प्रत्युत्तर.
सोशल माध्यमावर व्हिडिओ आणि पोस्ट करणाऱ्या युजर्सना पोलीस प्रशासनाचं आवाहन, बीड जिल्ह्यातील परिस्थिती पाहता चुकीचे मेसेज, शस्त्राचे फोटो न पाठवण्याचं आवाहन, नियमांचं पालन न केल्यास कायदेशीर कारवाई.
वैयक्तीक स्वार्थासाठी महिला कलाकारांना टार्गेट केलं जातंय, पुरुष कलाकारांचं नाव का घेतलं नाही?, प्राजक्ता माळीचा सुरेश धस यांना सवाल.
प्राजक्ता माळीबद्दल चुकीचं वक्तव्य केलं नाही, प्राजक्ता माळीला तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार, भाजप आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया.
सुरेश धस यांचं वक्तव्य इव्हेंटसंदर्भात होतं, त्यांच्या विधानाला ट्विस्ट करण्याची गरज नव्हती, त्यांनी कुणाच्याही चारित्र्यावर शिंतोडे उडवले नाही, अमोल कोल्हेंचं वक्तव्य.
न्याय मिळाला नाही तर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू, सरकारवर विश्वास, पण दिरंगाई का होतेय? संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सुरेश धस यांचा सवाल.