(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 1 PM : 27 ऑक्टोबर 2024: ABP Majha
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 1 PM : 27 ऑक्टोबर 2024: ABP Majha
भाजप नेते सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्या सभेत वसंतराव देशमुख (Vasantrao Deshmukh) यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या कन्या जयश्री थोरात (Jayshree Thorat) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वसंत देशमुख यांना अहमदनगर जिल्ह्याच्या बाहेरून ताब्यात घेण्यात आलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. नगर जिल्हा बाहेरून ताब्यात घेतल्याची माहिती आहे, त्यांच्यावब गुन्हा दाखल झाल्यापासून ते गायब होते. आक्षेपार्ह वक्तव्य केल्यापासून ते फरार होते, त्यानंतर पोलिस त्यांच्या मागावर होते, ते नर जिल्ह्याच्या बाहेर असताना त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांना लवकरच नगरमध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर त्यांना कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे. नेमकं काय आहे प्रकरण? भाजप नेते सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्या सभेत वसंतराव देशमुख (Vasantrao Deshmukh) यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या कन्या जयश्री थोरात (Jayshree Thorat) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर संगमनेरमध्ये (Sangamner) मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. तर संगमनेर पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल 12 तास ठिय्या मांडला. त्यांनतर पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर संगमनेरचे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले होते.