Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 12 PM : 26 जुलै 2024: ABP Majha
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 12 PM : 26 जुलै 2024: ABP Majha
ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये विधानसभेसाठी चाचपणी, नाशिक जिल्ह्यात ५ ते ६ जागांवर ठाकरे गटाचा दावा, जिल्ह्यातील सर्व 15 मतदारसंघांचा उद्धव ठाकरे गटाकडून आढावा
राज्यात यंदा बहुरंगी लढती होणार असून महायुतीला १६५ जागा मिळतील, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा.
अनिल देशमुखांचा मुलगा त्यांच्याच मतदारसंघातून लढण्यास इच्छुक, त्या घडामोडी पासून सर्वांचे लक्ष विचलित करण्यासाठी अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर आरोप, आशिष देशमुखांचं अनिल देशमुखांच्या टीकेवर प्रत्युत्तर.
आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाची पुन्हा हायकोर्टात धाव, तातडीच्या सुनावणीसाठी विनंती, उध्दव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी भरत गोगावलेंची याचिका.
आमदार अपात्र न करण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान, आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी घेण्याची गोगावलेंकडून विनंती, मात्र शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून तातडीच्या सुनावणीवर आक्षेप.
भाजपचे माजी आमदार रमेश कुथे आज ठाकरे गटात प्रवेश करणार. पक्षप्रवेशावेळी दिलेली आश्वासनं भाजपनं पूर्ण न केल्याचा रमेश कुथेंचा आरोप.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवारांची रात्री दीड तास बैठक, राज्यातील नुकसान, पावसाच्या पाण्याच्या नियोजनासंदर्भात बैठकीत चर्चा