एक्स्प्लोर

Union Budget 2025: अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरदूत; वंदे भारत, बुलेट ट्रेन, रेल्वे बजेटमध्ये काय काय?

Union Railway Budget 2025: मोदी सरकारच्या काळात रेल्वेचं नवं जाळ निर्माण करताना रेल्वे प्रकल्पांना गती देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala sitharaman) यांनी यंदाचा 2024-25 चा अर्थसंकल्प सादर केला. तत्पूर्वी, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांची भेट त्यांना अर्थसंकल्प टॅब देण्यात आला. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारमण 8 व्यंदा संसदेत अर्थसंकल्प मांडत आहेत. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिक ते सर्वच क्षेत्राला त्यांच्याकडून व मोदी सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget 2025) रेल्वेचं बजेट काय असणार, प्रवाशांना काय सुविधा, सवलती मिळणार याकडे देखील देशाचे लक्ष लागले होते. त्यानुसार, अर्थमंत्र्यांनी रेल्वेचा (Railway) अर्थसंकल्प देखील सादर केला. त्यामध्ये, नव्या रेल्वेगाड्या, बोगी, दुपदरीकरण, मेट्रो आणि वंदे भारत ट्रेनसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी केंद्र सरकारकडून रेल्वेचं बजेट स्वतंत्रपणे सादर करण्यात येत होतं. मात्र, मोदी सरकारच्या गेल्या काही वर्षात रेल्वे बजेटही नियमित बजेटमधून सादर केले जात आहे. त्यानुसार, आज अर्थमंत्र्‍यांनी रेल्वे बजेटही त्यातच सादर केले. 

मोदी सरकारच्या काळात रेल्वेचं नवं जाळ निर्माण करताना रेल्वे प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. त्यातच, वंदे भारत एक्स्प्रेस, अमृत भारत ट्रेन, बुलेट ट्रेन, महानगरातील मेट्रो प्रकल्पना अधिक गतिमान करण्यात आल्याचं पाहायला मिळाला. त्यात, आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी तब्बल 1 लाख 38 हजार 35 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर, महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 6640 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

रेल्वेसाठी 1 लाख 38 हजार कोटींची तरतूद

अर्थमंत्र्‍यांनी सादर केलेल्या वार्षिक 2025 च्या बजेटमध्ये रेल्वे मंत्रालयासाठी 1 लाख 38 हजार कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. 

रेल्वेगाड्या,बोगींसाठी 45 हजार 530 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

नव्या रेल्वेमार्गांसाठी 32 हजार 235 कोटींची तरदूत करण्यात आली

रेल्वे मार्गांच्या दुपदरीकरणासाठी 32 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

रेल्वेचे गेज बदलण्यासाठी 4 हजार 550 कोटी, रेल्वे सेवा,यार्ड आधुनिकीकरण व इतर कामांसाठी 8 हजार 601 कोटी तरतूद केली आहे.

रेल्वेमार्गांच्या नूतनीकरणासाठी 22 हजार 800 कोटी, रेल्वे सिग्नल आणि टेलिकॉमसाठी 6 हजार 800 कोटींची तरतूद अर्थमंत्र्‍यांनी केली आहे.

रेल्वेमार्गांच्या विद्युतीकरणासाठी 6 हजार 150 कोटी

रेल्वे पूल, बोगदे व अन्य बांधकामांसाठी 2 हजार 169 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद यंदाच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे.

एकूण रेल्वे बजेटसाठी यंदाच्या अर्थसंकल्पातून 1 लाख 38 हजार 35 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

महाराष्ट्रासाठी 6640 कोटींची तरतूद

देशाच्या बजेटमधून महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठीही भरगोस निधी मिळाला आहे. त्यानुसार, पुणे मेट्रोसाठी 837 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या चार प्रकल्पांसाठी 4 हजार 3 कोटी, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे– प्रशिक्षण संस्थेसाठी 126 कोटी 60 लाख, तर मुंबई मेट्रोसाठी 1673 कोटी 41 लाख रुपयांची तरतूद आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी तब्बल 6640 कोटी रुपयांची तरदूत करण्यात आल्याचं दिसून आलं. 

हेही वाचा

देशाच्या बजेटमधून पुणे, मुंबईसह महाराष्ट्राला काय मिळालं; अर्थमंत्री अजित पवारांनी सविस्तर सांगितलं

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget