Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : Mahayuti | MVA : ABP Majha 18 जून 2024 : 6 PM
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : Mahayuti | MVA : ABP Majha 18 जून 2024 : 6 PM
रोहित पवारांची भाजपमध्ये जाण्याची इच्छा होती, त्यांनी भाजपमधूनच निवडणूक लढवायचं ठरवलं होतं, सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट.
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात मराठा आंदोलनाचा परिणाम झाला, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची प्रतिक्रिया.
छगन भुजबळ यांची मागील काही दिवसांपासून गळचेपी सुरू आहे. मनुस्मृती बाबत त्यांनी लगेच भूमिका घेतली होती. त्यांना घुसमटल्या सारखं वाटतं हे नक्की. जितेंद्र आव्हाडांची भुजबळांच्या नाराजीवर प्रतिक्रिया.
रिक्षा, टॅक्सी चालकांना ग्रॅच्युईटी देण्याचा मानस, ग्रॅच्युईटीसाठी वर्षाला ३०० रुपये भरावे लागणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा.
पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्यांमध्ये ४० टक्के उमेदवार उच्चशिक्षित असल्याची माहिती, एकूण १७ हजार जागांसाठी १७ लाख ७६ हजार २५६ अर्ज.
महापारेषणची पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात रद्द झाल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त, फसवणूक झाल्याची परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या भावना.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
