SA vs AFG Semi-final : अफगाणिस्तान फायनलमध्ये पोहचणार? चोकर्स दक्षिण आफ्रिकेच्या कमजोरीचा फायदा घेणार
T20 World Cup 2024 Semi-final 1 : टी20 वर्ल्ड कपच्या पहिल्या उपांत्य सामन्यात अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होत आहे. अफगाणिस्तानचा संघ फायनलमध्ये धडक माऱण्याची शक्यता आहे.
![SA vs AFG Semi-final : अफगाणिस्तान फायनलमध्ये पोहचणार? चोकर्स दक्षिण आफ्रिकेच्या कमजोरीचा फायदा घेणार sa vs afg t20 world cup 2024 afghanistan can reach in final as south africa world cup knock out record terrible SA vs AFG Semi-final : अफगाणिस्तान फायनलमध्ये पोहचणार? चोकर्स दक्षिण आफ्रिकेच्या कमजोरीचा फायदा घेणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/02e6b6419734aab5d38801b072a9cf791719425458509265_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
SA vs AFG T20 World Cup 2024 Semi-final 1 : सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत अफगाणिस्तान संघाने उपांत्य फेरीत स्थान पटकावले. अफगाणिस्तानचा सामना आता दक्षिण आफ्रिकासोबत होत आहे. गुरुवारी सकाळी सहा वाजता सामन्याला सुरुवात होत आहे. अफगाणिस्तानकडे फायनलमध्ये पोहचण्याची नामी संधी आली आहे. त्याला कारण दक्षिण आफ्रिका असेल.. होय.. दक्षिण आफ्रिका संघाला चोकर्स म्हणून ओळखलं जाते. आतापर्यंत दक्षिण आफ्रिका संघाने मोक्याच्या क्षणी नांगी टाकली आहे. आयसीसी स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला आतापर्यंत शानदार कामगिरी करता आलेली नाही. मोक्याच्या क्षणी त्यांचा संघ ढेपाळतो, हा इतिहास आहे. दबावात आफ्रिका संघ कोलमडतो, याचाच फायदा अफगाणिस्तानचा संघ घेऊ शकतो.
नॉकआऊटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाचा रेकॉर्ड अतिशय खराब आहे. वनडे आणि टी20 विश्वचषकात आफ्रिकाने आतापर्यंत 10 नॉकआऊट सामने खेळले आहेत, त्यामध्ये त्यांना फक्त एक विजय मिळवता आलाय. तयांचा एक विजय 2015 वनडे वर्ल्डकपमध्ये क्वार्टर फायनल सामन्यात श्रीलंकाविरोधात आला होता. पण त्यानंतरच्या उपांत्य सामन्यात त्यांचा पराभवच झाला होता. नॉकआऊट सामन्यात आफ्रिकेला लौकिकास साजेशी कामगिरी करता येत नाही, दबावात ते ढेपाळतात. टी20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकाने आतापर्यंत दोन वेळा नॉकआऊट सामने खेळले आहेत, त्या दोन्ही उपांत्य सामन्यात त्यांचा पराभव झालाय. नॉकआऊटमधील खराब कामगिरी कऱणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला क्रिकेटविश्वात चोकर्स नावाने ओळखलं जाते. याचाच फायदा आफगाण संघ घेऊ शकतो.
वर्ल्ड कप नॉकआउट सामन्यात दक्षिण अफ्रीका संघाचे प्रदर्शन (वनडे आणि टी20 वर्ल्ड कप)
1992 - सिडनीमध्ये उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून पराभव
1996 - कराचीमध्ये क्वार्टर फायनलमध्ये वेस्ट इंडिजने हरवले.
1999 - बर्मिंघमनध्ये ऑस्ट्रेलियाविरोधातील उपांत्य सामना टाय झाला, त्यानंतर स्पर्धेतून बाहेर गेले.
2007 - सेंट लूसियामध्ये उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिकडून पराभव
2011 - मीरपूरमध्ये क्वार्टर फायनलमध्ये न्यूझीलंडने पराभूत केले.
2015 - सिडनीमध्ये क्वार्टर फायनलमध्ये श्रीलंकाचा पराभव केला.
2015 - ऑकलँडमध्ये उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने हरवले.
2023 - कोलकातामध्ये उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव
2009 - नॉटिंघममध्ये उपांत्य सामन्यात पाकिस्तानकडून पराभव (टी20 वर्ल्ड कप)
2014 - मीरपूरमध्ये भारताने धूळ चारली. (टी20 वर्ल्ड कप).
टी20 विश्वचषक 2024 मध्ये दोन्ही संघाची कामगिरी -
अफगानिस्तान :
साखळी फेरीत अफगानिस्तानने चार पैकी तीन सामन्यात विजय मिळवला. युगांडा, न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनी यांचा पराभव केला. ग्रुप स्टेजमध्ये फक्त वेस्ट इंडिजकडून त्यांचा पराभव झाला. सुपर 8 मध्ये फक्त भारताविरोधात अफगाण संघाला पराभवाचा धक्का बसला. ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्याविरोधात विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली.
दक्षिण अफ्रीका :
साखळी फेरीत दक्षिण अफ्रीकाने सर्व सामने जिंकत सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला. त्यांनी नेदर्लंड, बांग्लादेश आणि नेपाळचा पराभव केला. त्यानंतर सुपर 8 मध्येही आफ्रिका संघ अजेय राहिला. त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचा पराभव केला. आता उपांत्य फेरीत त्यांचा सामना अफगाणिस्तानविरोधात होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)