कौन है राहुल, ये है राहुल! मोदींना आता राहुल गांधींना रामराम करुनच लोकसभेत यावं लागणार; संजय राऊतांचं ट्विट चर्चेत
लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांना अध्यक्षपदाच्या आसनावर बसवलं. त्यावेळचा एक फोट ट्विट करत संजय राऊतांनी भाजपला डिवचलं.
मुंबई: कालपर्यंत कोण राहुल गांधी (Rahul Gandhi) असं म्हणणाऱ्यांना आज ते कोण आहेत याचा अंदाज आला असेल अशा अर्थाने शिवसेना संजय राऊतांनी (Sanjay Raut) एक ट्विट केलं आणि त्याची सोशल मीडियावर चर्चा झाली. कौन राहुल? ये है राहुल! ये तो ट्रेलर है, आगे आगे देखो होता है क्या? असं ट्विट करत संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला डिवचलं आहे. तसेच यापुढे लोकसभेत येताना नरेंद्र मोदींना राहुल गांधी यांना रामराम करूनच यावं लागेल असाही टोला संजय राऊतांनी लगावला.
हा हा हाहा
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 26, 2024
कौन राहुल?
ये है राहुल!
ये तो ट्रेलर है. आगे आगे देखो होता है क्या?@RahulGandhi @BJP4India pic.twitter.com/FFbzQditKS
18 व्या लोकसभेच्या अध्यक्ष पदासाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. आवाजी मतदानाद्वारे 'ओम बिर्ला' यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांना सन्मानपूर्वक त्यांच्या आसनापर्यंत पोहोचवलं. याच प्रसंगाचा फोटो ट्विट करत संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्यावर विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलं आहे.
#WATCH दिल्ली: शिवसेना नेता संजय राउत ने कहा, "... हमने विरोध नहीं किया, परंपरा है कि चुनाव नहीं होना चाहिए, हमने ये भी दिखाया कि हम आपके सामने खड़े रहेंगे और हैं। ओम बिरला ने एक झटके में 100 से ज्यादा सांसदों को निलंबित कर दिया था आपातकाल में ऐसा नहीं हुआ था... डिप्टी स्पीकर… pic.twitter.com/GNsSV0OWNk
— ANI_HindiNews (@AHindinews) June 26, 2024
निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. मात्र लोकसभेचे निकाल लागल्यानंतर काँग्रेस आणि इंडिया आघाडीला चांगलं यश मिळालं. 99 जागा मिळालेल्या काँग्रेसला यावेळी विरोधी पक्षनेतेपद मिळणार असून त्या जागेवर राहुल गांधी यांची वर्णी लागणार आहे.
राहुल गांधी विरोधी पक्षनेतेपदी
राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते बनणार हे आता निश्चित झालं आहे. यापूर्वी 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते होण्यासाठी पक्षाकडे बहुमत नव्हते.
लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी मोठी असते. विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो आणि कोणत्याही कॅबिनेट मंत्र्याला दिल्या जाणाऱ्या सुविधा त्याला मिळतात. सरकारी कामासाठी स्वत:चे स्वतंत्र कार्यालय मिळते. यापूर्वी गांधी घराण्यातील राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षनेत्यांची भूमिका बजावली आहे.
ही बातमी वाचा: