Zero Hour Full : विधानसभा अधिवेशनात फक्त राजकारण की चर्चा जनहिताची ?
Zero Hour Full : विधानसभा अधिवेशनात फक्त राजकारण की चर्चा जनहिताची ?
आक्रमक विरोधकांची... आणि पॉवरफुल सत्ताधाऱ्यांची.. यातलं एक सभागृह आहे लोकसभेचं... आणि दुसरं विधानसभेचं... आठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली.. आणि आज लोकसभेला नवे अध्यक्ष मिळालेत.. ओम बिर्ला यांनी आज पुन्हा एकदा लोकसभा अध्यक्ष म्हणून सूत्र हाती घेतली.. मात्र, त्यांच्या निवडीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी... यांच्यातलं एक दुर्मिळ दृश्य देशानं पाहिलीत.. संसदेतला आज आणखी एक सामना ही पाहायला मिळाला.. तो सामनाही आपण आज पाहणार आहोत.. मात्र, सुरुवात राज्यातल्या सेमिफायनलने.. ज्याचा सामना उद्यापासून राज्यात सुरु होणारय.. तो आहे.. महाराष्ट्र सरकारच्या या टर्मचं शेवटचं अधिवेशन... पावसाळी अधिवेशन... याच अधिवेशनात अनेक मुद्दे गाजणार यात काही शंकाच नाही.. शिंदे सरकारकडे जवळपास दोनशे आमदारांचा पाठिंबा असला तरी.. लोकसभेच्या निकालानं वारं फिरलंय.. आजच विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार ठाकला.. आणि आपल्या अजेंड्यावरचे मुद्दे माध्यमांसमोर मांडले.. त्याबरोबर पुणे ड्रग्ज प्रकरण, घाटकोपर होर्डिंग प्रकरणात झालेली कारवाई, देशात गाजणाऱ्या नीट घोटाळा प्रकरणात लातूर कनेक्शन.. यासह तरुणाईच्या प्रश्न विरोधकांच्या मागण्यामध्ये असतील.. हे स्पष्ट झालंय. याच अधिवेशनात २८ जूनला अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्पही मांडणार आहेत.. त्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाला अनेक अर्थांनं महत्व येतं.. आणि याच अधिवेशनाच्या कामाकाजवर आहे आपला आजचा पहिला प्रश्न... तोच पाहण्यासाठी जावूयात पोल करुयात.