(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 25 News : टॉप 25 न्यूज : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 29 July 2024 : ABP Majha
सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची मातोश्रीवर धडक, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी अशी शिष्ट मंडळाची मागणी.
आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे बीड दौऱ्यावर, पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी, यावेळी भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडे यांची केली पेढे तुला.
लाडकी बहीण योजनेऐवजी कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या, पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका, आमदार बच्चू कडूंची सरकारवर सडकून टीका.
अजित पवार गटाच्या मावळच्या जागेवर भाजपचा दावा, सुनील शेळकेंच्या अडचणी वाढण्याची चिन्ह, २ ऑगस्टला मावळमध्ये भाजपचा मेळावा.
पुण्यातल्या पूरस्थितीला जबाबदार ठरवत सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन, पण खलाटे यांना बळीचा बकरा बनवल्याची चर्चा, खलाटे रात्रभर एकतानगरमध्ये पूरस्थिती हाताळत होते अशी माहिती.
पुणे पालिकेचे सहायक आयुक्त संदीप खलाटेंच्या निलंबनाच्या निषेधार्थ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून काळ्या फीती लावून आंदोलन, पूर परिस्थितीवेळी खलाटे स्वतः पुराच्या पाण्यात उतरून काम करत असतानाही निलंबन केल्यानं आक्रमक.
भाजपचे जेष्ठ नेते हरिभाऊ बागडेंनी राज्यपाल पदी वर्णी लागल्यानंतर आज अजितदादांची भेट घेतली, देवगिरी या निवासस्थानी जाऊन घेतली भेट .
राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार राजेश विटेकरांनी अजितदादांची भेट घेतली, विधान परिषदेचा आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर घेतली भेट.