फडणवीस मतदारसंघात मात्र भाजपचा माजी आमदाराची दांडी; गडी थेट सोलापुरात उगवला, अजितदादांच्या शेजारी बसून केली चर्चा, नक्की काय घडलं?
Maharashtra Politics: मंगळवेढ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला परिचारक यांनी दांडी मारल्याचे बोलले जातं आहे. पण सोलापुरातील कार्यक्रमात मात्र उपस्थित असल्याचे चित्र दिसून आले.
सोलापूर: गेल्या काही दिवसांपासून मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यामध्ये राजकीय मतभेद सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातून समाधान अवताडे हे विद्यमान आमदार असले तरी प्रशांत परिचारक देखील या मतदार संघातून इच्छुक असल्याचे बोलले जातं आहे. यावरूनच दोघांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगल्या आहेत. त्यामुळेच मंगळवेढ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला परिचारक यांनी दांडी मारल्याचे बोलले जातं आहे. पण सोलापुरातील कार्यक्रमात मात्र प्रशांत परिचारक आणि समाधान अवताडे हे दोघेही एकाच व्यासपीठावर अगदी शेजारी उभे असल्याचे चित्र दिसून आले.
फडणवीस यांचे भाषण सुरु असताना प्रशांत परिचारकांची अजित दादांसोबत मंचावरचं जवळपास 15-20 मिनिटं चर्चा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी मंगळवेढा तालुक्यात विविध कामांचा शुभारंभ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी काल (मंगळवारी) सोलापुरात झालेल्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात मात्र हजेरी लावली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरु असताना प्रशांत परिचारक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत मंचावरचं जवळपास 15-20 मिनिटं चर्चा देखील केली.
मात्र, मागील काही दिवसांपासून विद्यमान आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यात राजकीय मतभेद सुरू असल्याच्या चर्चा आहेत. पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातून समाधान अवताडे हे विद्यमान आमदार असले तरी प्रशांत परिचारक देखील या मतदार संघातून इच्छुक असल्याचे बोलले जातं आहे. यावरूनच दोघांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगल्या आहेत. त्यामुळेच मंगळवेढा येथे फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला परिचारक यांनी दांडी मारल्याचे बोलले जातं आहे. पण सोलापुरातील कार्यक्रमात मात्र, प्रशांत परिचारक आणि समाधान अवताडे हे दोघेही एकाच व्यासपीठावर अगदी शेजारी-शेजारी उभे असलेले पाहायला मिळाले. मात्र या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचे बोलणे झाले नाही. तर दुसरीकडे अजित पवार यांच्यासोबत जवळपास 15-20 मिनिटं झालेल्या चर्चेत प्रशांत परिचारक यांनी दादांना नेमकं काय सांगितलं हे मात्र गुलदस्त्यात आहे.
यावेळी विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार समाधान आवताडे किंवा प्रशांत परिचारक यांच्यापैकी एक जण ही लढवणार अशी चर्चा सुरू झाली आहे. शिवाय या मतदारसंघातील आमदार आवताडे यांनी कामे केल्यामुळे आणि जातीय समीकरणामुळे त्याचबरोबर विद्यमान आमदार असल्यामुळे कदाचित तेच पुन्हा भाजपचे (BJP) उमेदवार होतील, अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. मात्र, पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातून समाधान अवताडे हे विद्यमान आमदार असले तरी प्रशांत परिचारक देखील या मतदार संघातून इच्छुक असल्याचे बोलले जातं आहे. त्यामुळे नेमकी संधी कोणाला मिळणार याबाबतची उत्सुकता आहे.