ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 11 AM 09 October 2024
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 11 AM 09 October 2024
महाविकास आघाडीत २४० ते २५० जागांवर एकमत, सुत्रांची माहिती, ४० ते ५० जागांवर अजूनही चर्चा, ठाकरे गट आणि काँग्रेस १०० पेक्षा जास्त जागा लढवण्याच्या तयारीत
'स्वबळावर लढायचं असेल तर काँग्रेसने तसं जाहीर करावं', 'मग इतर पक्षही आपली भूमिका घेऊ शकतील, संजय राऊतांचा थेट इशारा
भाजपची उमेदवार निवड प्रक्रिया जवळपास पूर्ण, आठवडाभरात पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता, उमेदवार निश्चितीसाठी दोन दिवस भाजपच्या बैठका
महायुतीच्या जागावाटपात भाजपच्या अटी? जागा हवी तर जिंकण्याच्या क्षमतेचा उमेदवार सांगा, मगच मतदारसंघ.. १५५ पेक्षा जास्त जागांसाठी भाजप ठाम, तर शिंदे गटाला ६० पेक्षा जास्त जागा
आपली राजकीय भूमिका कोणाला दुखवायची नव्हती, निर्णय घेतला तो पवार साहेबांना सांगून आणि संमतीनेच.. बारामतीतल्या डॉक्टर मेळाव्यात अजित पवारांची स्पष्टोक्ती
राज्याला मिळणार १० नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं... १० पैकी ५ महाविद्यालयं एकट्या विदर्भात, पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन