TOP 100 Headlines : 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 24 June 2024 : 10 AM : ABP Majha
TOP 100 Headlines : 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 24 June 2024 : 10 AM : ABP Majha
पुण्यातील हॉटेलमध्ये राजरोस ड्रग्स विक्री, फर्ग्यसून रोडवरील हॉटेलचा व्हिडीओ व्हायरल, पाच जण पोलिसांच्या ताब्यात, हॉटेल सील
पुणे ड्रग्जप्रकरणात आज दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन, काल दोन बीट मार्शलनाही केलंय सस्पेंड ड्रग्जप्रकरणी ४ पोलीस सस्पेंड
पुणे ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत ८ जणांविरुद्ध गुन्हा, तर ७ जणांंना अटक
मुंबईतील ड्रग्ज तस्करांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईची थक्क करणारी आकडेवारी.मुंबई पोलिसांनी पकडलं ५ महिन्यांत ४७३ कोटींचं ड्रग्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा, काल रात्री एकटेच दिल्लीला जाऊन आल्यानं चर्चेला उधाण, मंत्रिमंडळ विस्ताराचा दोन दिवसांत निर्णय होईल अशी चर्चा... तर आज अजित पवारही दिल्लीला जाण्याची शक्यता.
संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज पंतप्रधान लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेणार. त्यानंतर मंत्रिमंडळ आणि नव्या खासदारांना हंगामी अध्यक्ष शपथ देणार