(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime: पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, गुड टच बॅड टचची माहिती देताना लेकीनं आईला सांगितला प्रकार
Pune Crime: पुण्यातील वानवडीत स्कुल बसचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच तिसरीत शिकणाऱ्या मुलीवर शाळेतच लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे.
पुणे: सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढतानाचे चित्र दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडत असल्याचं चित्र आहे, मात्र, मागील तीन दिवसांमध्ये 4 लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांनी पालकांनी संताप व्यक्त केला आहे. मुली शाळेत कोणाच्या विश्वासावर पाठवायच्या, किंवा त्यांच्या सुरक्षेसाठी कोणावर अंवलबुन राहायचं असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत, पुण्यातील वानवडीत स्कुल बसचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एका लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं पुणं हादरलं आहे. तिसरीत शिकणाऱ्या मुलीवर शाळेतच लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे.
पुण्यातील खराडीतील शाळेत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी चंदन नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 ऑक्टोंबरला तिसरीच्या वर्गात शिकत असलेल्या चिमुकलीची आई तिला गुड टच आणि बॅड टचसंदर्भात माहिती सांगत होती. तिला या गोष्टी शिकवत होती, त्यावेळी चिमुकलीने शाळेत तिच्यासोबत असा प्रकार घडल्याचं सांगितलं. त्यानंतर आईने शाळेतील मुख्यध्यापकांना यासंदर्भात माहिती दिली. मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात घाव घेत तक्रार दाखल केली आहे. अजून आरोपीची ओळख पटलेली नाही पोलिसांकडून तपास सुरु आहे.
बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरूणीवर सामूहिक अत्याचार
पुण्याजवळील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचे मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे कारण देत अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर तिघांनी त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार (Pune Crime News) केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर आता संताप व्यक्त केला जात आहे, गुरूवारी पोलिस ठाण्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर संतप्त जमाव एकत्रित आला होता, त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेबाबत संतापजनक पोस्ट आपल्या सोशल मिडिया शेअर केली आहे, त्यानंतर या घटनेबाबत पोलिसांनी संपूर्ण माहिती दिली आहे.
8 वर्षांच्या दोन चिमुरड्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार
स्कुल बस ड्रायव्हरने दोन आठ वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील वानवडी भागात समोर आली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 45 वर्षांच्या स्कुल बस ड्रायव्हरला अटक केली आहे. 30 सप्टेंबरला हा स्कुल बस ड्रायवर विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत पोहचला. शाळा सुटल्यावर मुलींना पुन्हा घरी सोडताना त्याने आठ वर्षांच्या दोन पिडित मुलींना ड्रायव्हरच्या केबीनमधे बोलावले आणि त्यांच्यासोबत अश्लील चाळे केले. एका पिडीत मुलीने याबाबत पालकांना याबाबतची माहिती दिली त्यानंतर तक्रार दाखल केली, पोलिसांनी या प्रकरणी ड्रायव्हरला अटक करण्यात आली.