(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत तिप्पट वाढ, राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता किती मिळणार शिष्यवृत्ती?
मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांच्या रक्कमेत ही वाढ करण्यात आली आहे.
Savitribai Fule scholarship scheme : मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या मुलींना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांच्या रक्कमेत ही वाढ करण्यात आली आहे. या निर्णयानुसार राज्यातील इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना (Savitribai Fule scholarship scheme) अंतर्गत देण्यात येणाऱ्या रक्कमेत तब्बल तिप्पटीने वाढ करण्यात आली आहे.
शिष्यवृत्तीमध्ये किती वाढ करण्यात आली?
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून दिली जाणारी शिष्यवृत्ती ही राज्य शासनांच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग , महाराष्ट्र राज्य विभागामार्फत देण्यात येते. इतर मागास प्रवर्गातील इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिकण घेणाऱ्या फक्त मुलींना शिष्यवृत्तीच्या स्वरुपात 60 रुपये वरुन 250 प्रतिमहा अशी वाढ करण्यात आली आहे. तर विभाभज , विमाप्र व इतर मागास प्रवर्गातील इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना मासिक स्वरुपात दिली जाणारी 100 रुपयांची रक्कम ही 300 रुपये प्रतिमहा अशी वाढ करण्यात आली आहे.
लाभ घेण्यासाठी कसा अर्ज कराल?
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याची प्रक्रिया काय आहे? यासाठी नेमकं काय करावं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर सदर शिष्यवत्तीचा लाभ घेण्यासाठी आपल्या शाळेतील मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा. किंवा आपल्या जिल्ह्याच्या संबंधित प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याशी संपर्क साधावा. या शिष्यवृत्तीमुळं शिक्षण प्रभावामध्ये मुलींचे गळतीचे प्रमाणे कमी होण्यास मदत होत आहे.
महत्वाच्या बातम्या: