Pune Crime: अवघ्या 5 वर्षांच्या चिमुरड्याला अश्लील व्हिडीओ दाखवला, अल्पवयीन मुलांनी अत्याचार केला; पुण्याच्या कोंढव्यातील धक्कादायक घटना
Pune Crime: पुण्यात अत्याचाराच्या घटनांचे सत्र, सलग तिसऱ्या दिवशी संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील पाच वर्षांच्या मुलावर अल्पवयीन मुलांकडून लैंगिक अत्याचार
पुणे: राज्यातील महिला अत्याचाराच्या चीड आणणाऱ्या घटना ताज्या असतानाच आता पुण्यातील कोंढवा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका पाच वर्षांच्या मुलावर अल्पवयीन मुलांनीच अत्याचार (Sexual Assault) केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे कोंढवा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यात (Pune News) सलग तिसऱ्या दिवशी अत्याचाराची घटना समोर आली आहे. त्यामुळे या घटना रोखण्यासाठी आता करायचे असा प्रश्न पोलीस व्यवस्थेसमोर निर्माण झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलांनी पाच वर्षांच्या मुलाला प्रथम अश्लील व्हिडीओ दाखवला. त्यानंतर या अल्पवयीन मुलांनी तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलगा सोसायटीच्या आवारात खेळत होता. त्यावेळी तीन अल्पवयीन मुलांनी त्याला मोबाईलवर एक पॉर्न व्हिडीओ (Porn Video) दाखवला. त्यानंतर पिडीत मुलाच्या मोठ्या भावासमोरच या अल्पवयीन मुलांनी संबंधित मुलावर अत्याचार केले. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
पुण्यात सात महिन्यात 265 बलात्काराच्या घटना तर 450 विनयभंगाचे गुन्हे दाखल
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचे माहेरघर असा लोकसभा पुण्यात या वर्षातील फेब्रुवारी सात महिन्यात 265 बलात्काराच्या आणि 450 विनयभंगाची गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. महिला व मुला मुलींच्या सुरक्षेतेसाठी पुणे पोलिसांकडून दामिनी पथक,पोलीस काका,पोलीस दीदी आधी उपक्रम राबवले जात आहेत.तरीही दर महिन्याला बलात्काराच्या सरासरी 38 तर विनयभंगाचे 65 गुन्ह्याची पोलिसांकडून नोंद आहे. त्यामुळे पुणे सुरक्षित आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुण्यातील अत्याचाराच्या घटना
महिना बलात्कार विनयभंग
ऑगस्ट ३७ ६०
जुलै ३९ ४४
जून. ३५ ६२
मे ३७ ६५
एप्रिल ३६ ६६
मार्च ३९ ८५
फेब्रुवारी ४२ ६८
एकूण २६५ ४५०
आणखी वाचा
पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना, गुड टच बॅड टचची माहिती देताना लेकीनं आईला सांगितला प्रकार