(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Supriya Sule on NCP MLA Disqualification : निर्णय ऐकून काहीच आश्चर्य वाटलं नाही : सुप्रिया सुळे
Supriya Sule on NCP MLA Disqualification : निर्णय ऐकून काहीच आश्चर्य वाटलं नाही : सुप्रिया सुळे
मुंबई: राज्यघटनेतील दहावे परिशिष्ट हे म्हणजे पक्ष चालवण्यासाठीचे शस्त्र नाही. शरद पवार गटाने १० व्या सूचीचा गैरवापर करु नये. आमदारांचा आवाज दाबण्यासाठी प्रयत्न करु नये, अशा शब्दांत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शरद पवार गटाला खडसावले. शरद पवार गटाकडून अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल केल्या होत्या. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याप्रकरणात १० वे परिशिष्ट लागू होत नाही, असे सांगत शरद पवार गटाच्या तिन्ही याचिका फेटाळून लावल्या. त्यामुळे अजित पवार गटातील आमदारांच्या डोक्यावरील अपात्रतेची टांगती तलवार दूर झाली आहे.
यावेळी राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा, हे ठरवताना विधिमंडळातील बहुमत हा निकष ग्राह्य धरला. पक्षाची घटना आणि नेतृत्त्वाची रचना हे दोन निकष ग्राह्य धरता येणार नाहीत, नार्वेकर यांनी सांगितले. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी आपले निरीक्षण नोंदवताना म्हटले की, नवनवीन पक्षांसोबत व विचारसरणी सोबत हल्ली युती व आघाडी होताना आपण पाहत आहोत. पण त्याचा अर्थ प्रत्येक घटनेवर दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही. अजित पवार व शरद पवार या दोन गटांतील हा पक्षांतर्गत वाद आहे. त्यामुळे कोणीही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे याप्रकरणात दहाव्या सूचीनुसार कारवाई करता येत नाही, असे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले.