Sunandan Lele on Virat Kohli : विराट आणि रोहितचा T 20 क्रिकेटला रामराम
Sunandan Lele on Virat Kohli : विराट आणि रोहितचा T 20 क्रिकेटला रामराम
रोहित शर्मा आणि त्याच्या शिलेदारांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना त्यांच्या आयुष्यातली सर्वात अनमोल भेट दिली. ती भेट होती ट्वेन्टी२० विश्वचषकाची. राहुल द्रविड यांनी त्यांच्या १६ वर्षांच्या कारकीर्दीत भारताच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक अशी ओळख निर्माण केली होती. पण १६ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांना वन डे किंवा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक विजयाचं सुख कधीच लाभलं नव्हतं. अखेर भारतीय संघाचे प्रशिक्षक या नात्यानं राहुल द्रविड यांना ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक विजयाचं समाधान मिळालं. पाहूयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा खास रिपोर्ट. रोहित शर्मानं भारतानं टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर जंगी सेलिब्रेशन केलं. रोहित शर्मानं उपकॅप्टन हार्दिक पांड्याला त्याच्या कामगिरीबद्दल कौतुक म्हणून किस केलं. हार्दिकनं क्लासेन आणि मिलरची विकेट घेतली. रोहित शर्मानं पत्नी रितिका सचदेव हिला विजयानंर मिठी मारत विजय साजरा केला. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र, भारताला विजेतेपद मिळालं नव्हतं. अखेर रोहितच्या टीम इंडियानं अपयश पुसून टाकलं आहे. भारतानं 7 धावांनी मॅच जिंकली. विराट कोहलीवर रोहित शर्मानं विश्वास टाकला होता. अखेरच्या मॅचमध्ये रोहित , रिषभ अन् सूर्यकुमार लवकर बाद झाल्यानंतर विराट कोहलीनं केलेल्या 76 धावा गेमचेंजर ठरल्या. रोहितनं विराटला मिठी मारली.रोहित शर्मानं बारबाडोसच्या स्टेडियमवर नतमस्तक होत तिथूनच भारतमातेला वंदन केलं.
![Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/15/f2db504eb4e6fb7719d0b3515c1c2f741736965391071718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/15/2c22ce42593715937619f3c79b11423f1736943413409718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Walmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/15/18605ef292b794e6edd9c0f49327096f1736943095257718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/15/8c1b212bc26dd968ffc4d9846de0ed191736942697090718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Walmik Karad Case Court Hearing Update:वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी,कोर्टाचा निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/15/2341c20f0e0284a06afad2d93d7b7c7a1736941734857718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)