Sudhir Mungantiwar On Tatoba|ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्लीत नवीन मुख्य प्रवेशद्वाराचं उदघाटन
Sudhir Mungantiwar On Tatoba|ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्लीत नवीन मुख्य प्रवेशद्वाराचं उदघाटन
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली इथे नवीन मुख्य प्रवेशद्वाराचं उदघाटन, ताडोबाला आला आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाचा लुक ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली या मुख्य प्रवेशद्वाराचं नव्याने सुशोभीकरण करण्यात आलं असून एखाद्या आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळाचा या भागाला लुक देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. या ठिकाणी अतिशय भव्य आणि सुंदर असं प्रवेशद्वार तयार करण्यात आलं असून प्रवेशद्वारासोबतच निसर्ग माहिती केंद्र, प्रेक्षागृह, प्रतीक्षालय आणि उपहारगृह यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्प हे देशातल्याच नाही तर विदेशातल्याही पर्यटकांचं अतिशय आवडतं स्थळ आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आणि स्वरूप देण्याचा वनविभागाचा प्रयत्न आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या नवीन प्रवेशद्वाराचे आणि इतर सुविधांचे आज लोकार्पण करण्यात आलं. राज्यातील व्याघ्र प्रकल्प उत्तम दर्जाचे व्हावेत हा सरकारचा प्रयत्न आहे. जंगलं शाप नव्हे तर वरदान वाटावी यासाठी जंगलावर आधारित रोजगार निर्मिती हे आमचे लक्ष्य आहे. या पुढच्या काळात ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या धर्तीवर सफारीची उभारणी करण्यात येणार आहे. अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रसंगी दिली.