Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, पुरात काही जण अडकले NDRF टीम कुडाळमध्ये
Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस, पुरात काही जण अडकले NDRF टीम कुडाळमध्ये
Mumbai Rain : पावसामुळे पवई तलाव भरुन वाहू लागला, Mumbai Rain : पावसामुळे पवई तलाव भरुन वाहू लागला १८९० मध्ये १२.५९ लाख रुपये खर्चून बांधण्यात आला होता हा कृत्रिम तलाव या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक बाबींसाठी वापरण्यात येते बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज (दिनांक ०८.०७.२०२४) पहाटे ४:४५ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी व आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी वापरले जाते. गेल्या तीन दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.