एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Sujay Vikhe On Shirdi Templeसाई मंदिरात भाविक नोंदणी बंधनकारक करा; सुजय विखेंची साई संस्थानकडे मागणी
साई मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं रजिस्ट्रेशन बंधनकारक करा, अशी मागणी भाजपाचे माजी खासदार Sujay Vikhe यांनी साईबाबा संस्थानकडे केली आहे. तिरुपती बालाजीला जो नियम आहे, तोच नियम शिर्डीला लागू झाला पाहिजे, असं Vikhe म्हणाले. सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रत्येक भाविकाचं रजिस्ट्रेशन बंधनकारक करावं, अशी त्यांची भूमिका आहे. साई संस्थान कर्मचारी सोसायटीच्या दिवाळी शिधावाटपाच्या कार्यक्रमात त्यांनी ही मागणी केली. काही दिवसांपूर्वी मंदिर प्रमुखावर महिला भाविकाकडून भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी तक्रार दाखल होऊनही संबंधित महिलेचा शोध लागला नाही. हाच धागा पकडून Vikhe यांनी साई मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं रजिस्ट्रेशन होणं गरजेचं असल्याचं म्हटलं. "संस्थानमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे रजिस्ट्रेशन झालंच पाहिजे. नाहीतर यापुढे कोणी बॉम्ब ठेवून जाईल, आपण शोधत बसू," असं Vikhe यांनी स्पष्ट केलं. सीसीटीव्हीवर दिसला तरी तो कोण, हे दाखलाच सापडत नाही, असंही त्यांनी नमूद केलं. गुवाहाटीमधील डोंगरावरील मंदिरातही रजिस्ट्रेशन होतं, याचा दाखला त्यांनी दिला.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















