(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shahaji Maharaj Samadhi :Karnatakaच्या होदिगेरे येथील शहाजीराजेंच्या समाधी स्थळाचा जिर्णोद्धार होणार
गेली साडेतीनशे वर्ष कर्नाटकच्या होदिगेरे परिसरात असलेली छत्रपती शहाजीराजे भोसले यांचं समाधी स्थळ हे उघड्यावर आहे... ही बाब ज्येष्ठ इतिहास संशोधक पानिपतकार विश्वास पाटील यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर आता जीर्णोद्धार करण्यात येणारेय... यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशने पुढाकार घेतला आहे. पहिल्याच टप्प्यात शहाराजीराजे स्मारक ट्रस्टला पाच लाख रुपयांचा धनादेश फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आला आहे. शहाराजीराजे समाधी स्थळाची दुरावस्था झाल्याची बाब ज्येष्ठ इतिहास संशोधक पानिपतकार विश्वास पाटील यांनी निदर्शनास आणून दिली होती. याची तातडीने दखल घेण्यात आली. पाटील यांच्या उपस्थितीत ट्रस्टला पाच लाखाचा धनादेश देण्यात आला. शहाजीराजे स्मारक अभिवृद्धी सेवा समितीचे अध्यक्ष मल्लेश शिंदे यांच्याशी संपर्क साधून हे काम लवकरच पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.