एक्स्प्लोर
Parbhani Farmer On Sanjay Shirsat : शिरसाट यांनी राजीनामा द्यावा, परभणीचे शेतकरी शिरसाटांवर संतापले
कन्नडमधील (Kannad) पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकाला, पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी घरी बोलावून उपोषण सोडायला लावल्याने परभणीतील शेतकरी संतप्त झाले आहेत. 'हा निर्लज्जपणाचा कळस आहे, संजय शिरसाट यांनी तत्काळ राजीनामा द्यावा,' अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कन्नड तहसील कार्यालयासमोर संदीप सेठी हे नऊ दिवसांपासून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसले होते. मात्र, पालकमंत्री शिरसाट यांनी उपोषणस्थळी न जाता, 'वेळ नाही' असे कारण देत सेठी यांना रुग्णवाहिकेतून आपल्या घरी बोलावून घेतले आणि तिथे त्यांचे उपोषण सोडवले. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, सरकारने दिवाळीपूर्वी जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही आणि केवळ ₹8,500 खात्यावर जमा झाल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. ही शेतकऱ्यांची थट्टा असून, मंत्री कमिशनसाठी भांडत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
राजकारण
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

















