Sambhajiraje Chhatrapati : विशाळगडावरील कारवाईला धार्मिक रंग देऊ नका - संभाजीराजे छत्रपती
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगडावरील कारवाईला धार्मिक रंग देऊ नका - संभाजीराजे छत्रपती मी आक्रमक होतो पण मी माझ्या स्वर्थासाठी नाही तर शिवाजी महाराज यांच्या विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणामुळे आक्रमक झालो, या सगळ्यासाठी मी आक्रमक झालो असेल तर मला गर्व असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. खासदार शाहू महाराज यांनी संभाजीराजे यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यावर तीव्र शब्दात निषेध केला आहे. यानंतर आता संभाजीराजे यांनी भूमिका स्पष्ट केली. शाहू महाराज यांनी तीव्र शब्दात निषेध केल्यानंतर संभाजीराजे म्हणाले की, शाहू महाराज यांनी दोन भूमिका घेतल्या. एक म्हणजे त्यांनी खासदार म्हणून भूमिका घेतली. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीयांची बैठक लावायला पाहिजे असं शाहू महाराज यांनी सांगितली होते, पण अशी कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे शाहू महाराज यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले. जे घडलं त्याच मी समर्थन करत नाही पण कशामुळे हे घडलं याचं सरकारने आत्मपरीक्षण करावं. पालकमंत्र्यांच्या आदेशनं गुन्हा दाखल करायचा आहे का? दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे समजताच संभाजीराजे शाहूवाडी पोलिस स्टेशनला हजर झाले आहेत. मात्र, त्यांनी पोलिस थेट माहिती देत नसल्याचा आरोप केला आहे. पालकमंत्र्यांच्या आदेशनं गुन्हा दाखल करायचा आहे का? अशी विचारणा त्यांनी केली. ते म्हणाले की, माझ्यावर गुन्हा दाखल केला असे समजलं म्हणून मी स्वतः पोलीस ठाण्यात आलो. शाहूवाडी पोलिस ठाण्यात दीड तासापासून चर्चा झाली. सगळ्या घटनेला मला जबाबदार धरून मला अटक करा, शिवभक्तांना त्रास देऊ नका. गुन्हा दाखल केला असाल तर मी इथंच थांबतो, पण त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे संभाजीराजे म्हणाले. दरम्यान, विशाळगडावर पोलीस अधीक्षकांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली असे सांगितलं आहे. सुरुवात करताना हिंदूंनी केलेली अतिक्रमणे काढली, त्यामुळे याला जातीय रंग देऊ नका, असे ते म्हणाले. हसन मुश्रीफ यांच्यावर संभाजीराजे यांची टीका संभाजीराजे यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. माझ्या पुरोगामित्वावर प्रश्न चिन्ह करता, पण अतिरेकी यासिन भटकळ तिथं राहिला होता त्यावेळी कुठं पुरोगामी कुठं गेलं होतं? अशी विचारणा त्यांनी केली. दोन समाजात भांडण लावू नये.