Raj Thackeray Chiplun Daura Update : राज ठाकरेंचा 8 जुलैला होणारा चिपळूण दौरा पावसामुळे रद्द
राजकीय परिस्थितीमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ८ जुलैला चिपळूण दौरा आयोजित करण्यात आला होता. तो पावसामुळे रद्द करण्यात आला. परंतू, आज या दौऱ्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. राज ठाकरे १३ आणि १४ जुलैला चिपळूण आणि दापोली दौऱ्यावर आहेत... १३ जुलैला राज ठाकरे सकाळी १० वाजता चिपळूनला येतील. १०.३० वाजता मनसेच्या कार्यालयाचे उद्धाटन करणार आहेत. यानंतर ११ वाजता अतिथी हॉलमध्ये जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. दुपारी ३ वाजता लोटे परशुराम येथे तलाव सुशोभिकरणाचे उद्घाटन करणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता दापोली येथे पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करतील. आणि मंडणगड येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.























