एक्स्प्लोर

Pune Road Potholes वास्तव 82 : PM मोदींचा दौरा, रस्त्यांची डागडुजी,निकृष्ट कामामुळे नागरिकांचा संताप

Pune Road Potholes वास्तव 82 : PM मोदींचा दौरा, रस्त्यांची डागडुजी,निकृष्ट कामामुळे नागरिकांचा संताप

ही बातमी पण वाचा

Pune News: लाज गेली! पुण्याच्या खड्ड्यांवर द्रौपदी मुर्मू नाराज, दौऱ्यावेळी मोठा त्रास झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाची नाराजी, पुणे पोलिसांचं पालिकेला पत्र...

पुणे: पुण्यातील खड्डे हे पुणेकरांसाठी तर त्रासदायक ठरत आहेतच, आता या खड्ड्यांचा फटका देशाच्या राष्ट्रपतींना देखील बसला आहे. २ आणि ३ सप्टेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु पुणे दौऱ्यावर होत्या. पुण्यातील राजभवनला त्यांचा मुक्काम होता. तिथून कार्यक्रमांसाठी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जातांना राष्ट्रपतींच्या ताफ्यातील वाहनांना पुण्यातील खड्ड्यांचा मोठा त्रास झाला. राष्ट्रपती कार्यालयाने ही नाराजी पुणे पोलीसांना कळवली. त्यामुळे आता २६ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुण्यात येणार असल्यानं रस्त्यांवरील हे खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावेत यासाठी पुणे पोलिसांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय. राष्ट्रपती कार्यालयाने व्यक्त केलेली नाराजी पाहता पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास महापालिकेला सांगण्यात आलं आहे.

पुण्यात अनेक ठिकाणी मेट्रोची कामं सुरू आहेत. या कामांमुळे खड्डे पडत असल्याचा महापालिकेचा दावा आहे. त्यामुळे हे खड्डे महापालिकेने बुजवायचे की महापालिकेने यावरून दोन यंत्रणांकडून एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रकार याआधी झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी खड्डे कोण बुजवणार हे पहावं लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  २६ सप्टेंबरला पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रोच्या भुयारी मार्गाचे उद्घाटन करण्यासाठी पुण्यात येणार आहेत. त्याचबरोबर एस पी कॉलेजच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्या दौऱ्यामध्ये 26 सप्टेंबरला शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रोचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तसेच स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मेट्रोचे भूमिपूजन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ते शिक्षक प्रसारक मंडळी संस्थेचे स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर  सहभागी होतील.त्यानंतर ते पुणे मुक्कामी राहणार आहेत. त्यासाठीची सर्व व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

दुसऱ्या दिवशी मोदी (PM Narendra Modi) विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील विकसित भारत या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. बारा ते अडीच दरम्यानचा वेळ हा आरक्षित ठेवण्यात आला आहे. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील महायुतीच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करू शकतात अशी शक्यता आहे. 

27 सप्टेंबरला सायंकाळच्या  सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तुकाराम जगन्नाथ कॉलेज खडकी येथील विकसित भारतच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावतील आणि त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर येथे जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena Opration Tiger: शिंदेंकडे गेलेले 6 पैकी 2 खासदार पुन्हा येणार, ठाकरे गटाच्या दाव्याने खळबळ; माघारी येण्याचं कारणही सांगितलं!
शिंदेंकडे गेलेले 6 पैकी 2 खासदार पुन्हा येणार, ठाकरे गटाच्या दाव्याने खळबळ; माघारी येण्याचं कारणही सांगितलं!
Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंचा फोन अन् महायुतीच्या नंदकिशोर महाजनांच्या विजयाच्या मार्ग मोकळा, जळगाव विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट
एकनाथ शिंदेंचा फोन अन् महायुतीच्या नंदकिशोर महाजनांच्या विजयाच्या मार्ग मोकळा, जळगाव विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट
Music Composer Pritam Likely Get Retirement: अरिजित सिंहपाठोपाठ आणखी एक सुप्रसिद्ध गायक बॉलिवूड सोडण्याच्या तयारीत? 'त्या' पोस्टनं चाहत्यांची चिंता वाढवली
अरिजित सिंहपाठोपाठ आणखी एक सुप्रसिद्ध गायक बॉलिवूड सोडण्याच्या तयारीत? 'त्या' पोस्टनं चाहत्यांची चिंता वाढवली
Maharashtra Live News: एकीकडे ऑपरेशन टायगर, तर आज दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान
Maharashtra Live News: एकीकडे ऑपरेशन टायगर, तर आज दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान

व्हिडीओ

BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live News: एकीकडे ऑपरेशन टायगर, तर आज दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान
Maharashtra Live News: एकीकडे ऑपरेशन टायगर, तर आज दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान, 6 जागांवर मतदानाआधीच उमेदवार बिनविरोध विजयी; निवडणुकीची A टू Z माहिती
विधान परिषदेच्या 17 पैकी 11 जागांसाठी आज मतदान, 6 जागांवर मतदानाआधीच उमेदवार बिनविरोध विजयी; निवडणुकीची A टू Z माहिती
Yes Bank Share Price : 'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
HCC Share Price : 30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
Shivsena : ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
Prince Yadav: प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
Embed widget