(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Eco Friendly Makhar : पुण्यात पर्यावरणपूरक मखर खरेदीत वाढ
Pune Eco Friendly Makhar : पुण्यात पर्यावरणपूरक मखर खरेदीत वाढ
भाजपच्या (BJP) गोटातून एक महत्वाची बातमी पुढे आली आहे. आगामी विधानासभेच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने भाजपचं मेगा प्लॅनिंग करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. भाजपच्या वतीने पक्षातील चार दिग्गज नेत्यांवर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) , चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) या चार नेत्यांवर विधानासभेसाठीची महत्त्वाची जबाबदारी असणार आहे. दरम्यान, येत्या आठवड्याभरात 20 स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समिती जाहीर होणार आहे. निवडणूक व्यवस्थापन समितीचे रावसाहेब दानवे पाटील हे प्रमुख संयोजक असणार आहेत. तर अशोक चव्हाण, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, प्रवीण दरेकर, भाई गिरकर, अशोक नेते, अतुल सावे, संजय कुटे, जयकुमार रावल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांचा देखील या समितीत समावेश असणार आहे. तर दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे विशेष प्रचारक म्हणून एक महिना संपूर्ण महाराष्ट्र पालथा घालणार असल्याचेही बोलले जात आहे.