एक्स्प्लोर
Phaltan Doctor Suicide : '...ती 11 वाजता Status कसा Like करते?', Sushma Andhare यांचा सवाल, आत्महत्या की हत्या?
फलटणमधील (Phaltan) डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येवरून राजकारण तापले असून, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 'जर तिचा मृत्यू आधीच झाला होता, तर नंतर अकरा वाजता ती हा व्हाट्सअप स्टेटस लाईक कसा काय करते?', असा थेट सवाल सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत विचारला आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा त्यांनी केला असून, सुसाईड नोटमधील (Suicide Note) अक्षरांमधील वेलांटीच्या फरकाकडेही लक्ष वेधले आहे. तरुणीने ज्या हॉटेलमध्ये आयुष्य संपवले, त्याचे मालक निंबाळकरांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप आहे, मात्र हॉटेल मालकांनी हे आरोप फेटाळले आहेत. दुसरीकडे, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी (SP Tushar Doshi) यांनी सर्व डिजिटल पुराव्यांची (Digital Evidences) सायबर तज्ज्ञांमार्फत (Cyber Expert) तपासणी सुरू असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी उच्चस्तरीय समितीकडून तपास व्हावा, अशी मागणीही अंधारेंनी केली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















