(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pankaja Munde Lost Beed Result 2024 : बीडचा गड ढासळला; ओबीसी-मराठा राजकारणाचा पंकजांना फटका?
Pankaja Munde Lost Beed Result 2024 : बीडचा गड ढासळला; ओबीसी-मराठा राजकारणाचा पंकजांना फटका?
मराठा आरक्षण, मनोज जरांगे फॅक्टर, राष्ट्रवादीतील फूट या कारणांमुळे चर्चेत व लक्षवेधी ठरलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात क्रिकेट सामन्यातील शेवटच्या षटकांपर्यंत व्हावी अशी चूरस दिसून आली. शेवटच्या षटकात सामना बरोबरीत सुटावा आणि सुपर ओव्हरमध्ये सामन्याचा निकाला लागावा अशीच परिस्थिती बीडमधील लोकसभेच्या निवडणूक निकालात दिसून आली. पहिल्या फेरीपासून पुढील काही फेरीपर्यंत बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली होती. मात्र, 5 ते 10 हजारांच्या फरकावर सुरू असलेल्या फेऱ्यामुळे येथील मतदारसंघात अत्यंत चुरस निर्माण झाली होती. उमेदवारांची धाकधूक आणि कार्यकर्त्यांचीही उत्कंठा शिगेला पोहोचली, ती शेवटच्या 32 व्या फेरीपर्यंत कायम राहिली.
पंकजा मुंडेंनी बजरंग सोनवणेंची आघाडी तोडून तब्बल 43 हजारांची आघाडी घेतली होती. मात्र, 31 व्या फेरीत पुन्हा पंकजा मुंडेंचा लीड कमी होऊन बजरंग सोनवणेंनी आघाडी घेतली. पंकजा मुडेंचा लीड कमी होऊन शेवटच्या काही फेरीत हे मताधिक्य केवळ 400 मतांवर येऊन पोहोचलं होतं. त्यामुळे, राज्यात सर्वात थरारक आणि उमेदवारांच्या काळजाचे ठोके चुकवणारी ही लढत ठरली आहे. 31 व्या फेरीत बजरंग सोनवणेंनी आघाडी घेतल्यामुळे शेवटच्या म्हणजेच 32 व्या मतमोजणीकडे सर्वांचे लागले होते. 31 व्या फेरीअखेर बजरंग सोनवणे 688 मतांनी आघाडीवर पोहोचले होते. त्यामुळे, 32 व्या फेरीत नेमकं काय होईल, याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती.