(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रोहित पाटील उतरणार विधानसभेच्या आखाड्यात? वाढदिवसाच्या निमित्तानं मांडलं राजकीय गणित
कै. आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील (Rohit Patil) हे आज वयाची पंचविशी पूर्ण करत आहेत. वयाची 25 वर्ष पूर्ण झाल्यानं तोंडावर असंलेल्या विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील यांचा उतरण्याचा मार्ग देखील मार्ग मोकळा झालाय.
Rohit Patil : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी संपली आहे. आता पुढच्या काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुकीचा (Vidhansabha Election) रणसंग्राम सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी हालचालींना सुरुवात केलीय. निवडणुकीच्या दृष्टीनं गाठीभेटी दौरे सुरु केले आहेत. अशातच कै. आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील (Rohit Patil) हे आज वयाची पंचविशी पूर्ण करत आहेत. वयाची 25 वर्ष पूर्ण झाल्यानं तोंडावर असंलेल्या विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील यांचा उतरण्याचा मार्ग देखील मार्ग मोकळा झालाय. त्यामुळं रोहित पाटलांनी यंदा तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारससंघातून निवडणूक लढवावी असा आग्रह देखील कार्यकर्त्याकडून होत आहे.
पवारसाहेब, पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते मिळून निर्णय घेतील
रोहित पाटील यांच्या मनात आगामी विधानसभा निवडणुकीबाबत काय नियोजन आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केला. आता विधानसभा निवडणूक मी लढवावी का नाही? त्याबद्दल मी काय बोलायची आवश्यकता किंवा गरजेचे आहे असं मला वाटत नाही असे रोहित पाटील म्हणाले. आता विधानसभेच्या बाबतीत या मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते आणि आदरणीय पवारसाहेब, पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते सगळे मिळून एकत्रितपणाने निर्णय घेतील असे रोहित पाटील म्हणाले. त्यांनी अप्रत्यक्षपणे विधानसभा निवडणुकीत उतरण्याचे संकेत दिले आहेत. तसेच लोकसभेच्या निवडणूकमध्ये शरद पवार यांच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस मोठा विजय खेचू शकल्याचे रोहित पाटील म्हणाले. येणाऱ्या काळात सुद्धा विधानसभेला आम्ही त्याच पद्धतीने सामोरे जाणार आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष राहिला पाहिजे असे आमचे उद्दिष्ट असल्याचे देखील रोहित पाटील यांनी म्हटलं.
मतदारसंघातील बरीच कामे पूर्ण केली
मी मतदारसंघात अनेक दिवसांपासून काम करत आहे. दौरे करत आहे, लोकांचे प्रश्न समजून घेत आहेत. आबांना आणखी काही कामं करायची होती, मात्र, त्यांचं निधन झाल्यामुळं काही कामं झाली नाहीत. ती कामं आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे रोहित पाटील म्हणाले. बरीच कामे पूर्ण देखील केली आहेत. लोकांच्या आशा कामाच्या माध्यमातून पूर्ण केल्या पाहिजेत असे आम्हाला वाटते असे रोहित पाटील म्हणाले.
मतदारसंघात एमआयडीसी मंजूर
1997 साली आबांनी मतदारसंघाच एमआयडीसी आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी विरोधकांनी गैरसमज पसरवून तो प्रकल्प थांबवल्याचे रोहित पाटील म्हणाले. सहा महिन्यापूर्वी तासगाव कवठेमहांकाळसाठी एमआयडीसी मंजूर झाली असल्याचे रोहित पाटील म्हणाले. अनेक कंपन्यांशी मी चर्चा करत असल्याचे पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: