Omraje Nimbalkar : शिवजयंतीच्या निमित्ताने ओमराजे निंबाळकर आणि आमदार Kailas Patilही एकत्र
शिवजयंतीच्या निमित्ताने ओमराजे निंबाळकर आणि आमदार Kailas Patilही एकत्र उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील मुख्य कार्यक्रमात आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी पुढाकार घेत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना जवळ केले. त्यां दोघांच्या खांद्यावर हात टाकत हात उंचावून घोषणा दिल्या. शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन शिवसेनेत 2 गट पडल्यानंतर मंत्री सावंत आणि खासदार ओमराजे आणि आमदार पाटील यांच्यात दुरावा व अबोला होता तो आज काही अंशी दूर झाला. मंत्री सावंत व ठाकरे गटाचे खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांच्यात सुरुवातीला मधुर राजकीय संबंध होते मात्र शिवसेना फुटल्यानंतर अबोला होता.






















