एक्स्प्लोर
Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाचं आज लोकार्पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. नवी मुंबईतील नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आणि मेट्रो तीनच्या अखेरच्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत. विमानतळावर सर्वप्रथम पंतप्रधान मोदींचे विमान उतरणार असून, त्याला अग्निशमन दलाकडून पाण्याची सलामी दिली जाईल. मोदी विमानतळावर आल्यानंतर टर्मिनल इमारत आणि प्रकल्पाची माहिती घेतील. नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होईल, मात्र विमानसेवा सुरू होण्यासाठी नागरिकांना दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यातील प्रवाशांना फायदा होणार आहे. हे विमानतळ एक हजार १६० हेक्टरवर पसरलेले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन धावपट्ट्या आणि चार टर्मिनल आहेत. वर्षाला नऊ कोटी प्रवासी हाताळण्याची या विमानतळाची क्षमता आहे, तर मुंबईच्या सध्याच्या विमानतळाची क्षमता पाच ते साडेपाच कोटी प्रवासी इतकी आहे. नवी मुंबई विमानतळाची वर्षाला दहा लाख टन कार्गो हवाई वाहतुकीची क्षमता आहे. चारही टर्मिनल एकमेकांशी जोडलेली असून, ड्रायव्हर नसलेल्या भूमिगत ट्रेनमधून टर्मिनल्सवर फिरता येणार आहे. डिसेंबरपासून कार्गो वाहतूक सुरू होईल. आज आठ तारखेला मोदी दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी नव्या विमानतळावर उतरतील आणि विमानतळ परिसरात त्यांची जाहीर सभाही होणार आहे.
महाराष्ट्र
BMC Elections : भाजप, शिवसेना बीएमसीसाठी जागावाटपाचा तिढा सामोपचाराने सोडवणार
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















