Nitesh Rane UNCUT : "शिवसेनेने नुसतं श्रेय घेण्यापेक्षा, टीका न करता साथ दिली असती तर कोकणवासियांचा फायदाच झाला असता"
Sindhudurg : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं आज उद्घाटन होणार आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या विमानतळाचं आज लोकार्पण होतंय. पण हा कार्यक्रम राणे आणि शिवसेना यांच्यातल्या वादाची नांदी ठरण्याची शक्यता आहे. कारण खुद्द नारायण राणे यांनीच उद्याच्या लोकार्पण कार्यक्रमात शिवसेनेच्या नेत्यांबद्दल मोठा गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिलाय. कोकणात शिवसेनेची हप्तेबाजी सुरू आहे असा आरोप राणे यांनी माझाला दिलेल्या मुलाखतीत केला असून, शिवसेनेच्या हप्तेखोर नेत्यांची नावं आपण उद्याच्या कार्यक्रमात उघड करणार असल्याचं राणेंनी म्हटलंय. त्यामुळं नारायण राणे खरंच कुणाची नावं जाहीर करणार का? हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.






















