Wadha : आर्वीतील बहुचर्चित अवैध गर्भपात प्रकरणी डॉ. नीरज कदमला अटक
राज्यभर गाजत असलेल्या वर्धामधील आर्वीतील बहुचर्चित अवैध गर्भपात प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आलीय. याप्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. रेखा कदम यांचे पती नीरज कदम यांना अटक करण्यात आलीय. त्यामुळे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या सहा झालीय. आर्वी शहरात असलेल्या कदम रुग्णालयात गर्भपात केंद्र आणि सोनोग्राफी सेंटर आहे. गर्भपात केंद्र हे डॉ. रेखा कदम यांच्या सासू डॉ. शैलेजा कदम यांच्या नावावर आहे. तर सोनोग्राफी सेंटर हे डॉ. रेखा कदम आणि डॉ.नीरज कदम या दोघांच्या नावाने असल्याची माहिती मिळतेय. पोलिसांनी या प्रकरणी डॉ. रेखा कदम यांना सुरुवातीलाच अटक केलीय. त्यामुळे नीरज कदम यांच्या अटकेनंतर गर्भपातप्रकरणी आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी गोबर गॅसच्या खड्ड्यातून बारा कवट्या आणि 54 हाडं जप्त केली होती.



















