महाराष्ट्रात येणाऱ्यांना RTPCR अहवाल बंधनकारक; मध्यरात्रीपासून राज्याच्या सीमेवर वाहनांची तपासणी
नंदुरबार : नवापुर तालुक्यातील बेडकी सीमा तपासणी नाक्यावर नवापूर पोलिसांकडून गुजरात राज्यातून येणाऱ्या वाहन चालकांची आरपीटीसीआर रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास वाहनचालकांना महाराष्ट्र राज्यात प्रवेश दिला जात आहे. ज्या वाहन चालकांकडे आरपीटीसीआर कोरोना रिपोर्ट नसल्याने त्यांना महाराष्ट्रात प्रवेश न देता पुन्हा गुजरात राज्यात पाठवले जात आहे.
तसेच गुजरात राज्यातील उच्छल पोलिसांनी देखील महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात तपासणी सुरू केली आहे. ज्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे अशा लोकांना गुजरात राज्यात प्रवेश दिला जात आहे. कोरोना रिपोर्ट नसल्यास वाहनचालकांना महाराष्ट्रात परतवून लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागामध्ये महाराष्ट्र गुजरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे दोन्ही राज्यातील वाहनचालकांची कसून तपासणी केली जात आहे. गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची नोंद नवापूर पोलीस रजिस्टरमध्ये करीत आहे.