Nanded Rain : नांदेडमधील नद्या धोक्याच्या पातळीवर, गोवर्धनघाट स्मशानभूमी पाण्याखाली ABP Majha
नांदेड जिल्ह्यात सर्वत्र अति मुसळधार पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक छोट्या-मोठ्या नद्यांना महापूर आला आहे. शेत-शिवारासह अनेक गावातही पाणी शिरले आहे. यामुळे अर्धापूर तालुक्यातील शेलगाव, पिंपळगाव, सांगवी, मेंढला, शेणी या गावांचा संपर्क तुटला आहे. तर काढणीस आलेले सोयाबीन पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पैनगंगा नदीवरील इसापूर धरणाचे अकरा तर गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडण्यात आले असून नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. पावसामुळं खरीप पिकासह बागायती पिकांना फटका जिल्ह्यात गुलाबी वादळाचे काटे शेतकऱ्याचा अंगाला रुतले आहेत. नदीकाठच्या शेतजमीनी खरडून गेल्या आहेत. तर सोयाबीन, कापूस खरीप पिकासह हळद, केळी, ऊस बागायती पिकांनाही मोठा फटका बसला आहे. सततच्या होणाऱ्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे हवालदील झाला आहे.जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीनांदेड जिल्ह्यात रात्रीपासून सर्वदूर अतिवृष्टी झाली आहे. नदी काठावरील/ पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी. असा इशारा देण्यात आला आहे.