MVA and Mahayuti Andolan : शिवरायांची माफी मागण्यावरुन ठाकरे-फडवीसांमध्ये जुंपली
MVA and Mahayuti Andolan : शिवरायांची माफी मागण्यावरुन ठाकरे-फडवीसांमध्ये जुंपली
ही बातमी पण वाचा
Shivaji Maharaj Statue : शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा 96 वर्षानंतरही दिमाखात उभा, पुण्यातील शिवरायांच्या पुतळा निर्मितीची प्रेरणादायी गोष्ट
पुणे : सिंधुदुर्गमध्ये मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यापूर्वी उभारण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. स्वतंत्र भारतातील ही तशी पहिलीच घटना यामुळं असंख्य शिवप्रेमींना दु:ख झालं. मात्र, यानंतर राज्यभरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची चर्चा सुरु झाली. पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, प्रतापगड किल्ल्यावरील पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला महाराजांचा पुतळा, मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया आणि दादर येथील शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अजूनही दिमाखात उभा असल्याचं पाहायला मिळतं. पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा संकल्प राजर्षी शाहू महाराजांनी केला होता. पुढे राजाराम महाराज यांच्या कार्यकाळात तो पूर्ण झाला. हा पुतळा अजूनही दिमाखात असून त्याच्या निर्मितीचा विचार आणि निर्मितीची रंजक गोष्ट जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
राजर्षि शाहू महाराजांचा संकल्प
हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज महाराष्ट्रातील गावागावात पाहायला मिळतो. देशाच्या आणि जागाच्याही कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांची हीच प्रतिमा पुतळ्याच्या स्वरूपात साकारण्यात आलीय. शिवाजी महाराजांचे हे पुतळे ज्याच्यावर आधारलेले आहेत किंवा ज्या पुतळ्याला रोल मॉडेल मानून उभारण्यात आलेत तो शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे उभारण्यात आला माहितेय? छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकाराने शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीमध्ये उभारण्यात आला . 1917 साली हा पुतळा उभारण्याचा निर्णय झाला आणि तब्बल अकरा वर्षांच्या मेहनतीनंतर अनेक संकटांना पार करत हा पुतळा प्रत्यक्षात साकार झाला.
अन् युवराज प्रिन्स एडवर्डने स्मारकाच्या भूमिपूजनाला यायचं आमंत्रण स्वीकारलं
इंग्रजांच्या सत्तेबरोबरच युरोपियन शिल्पकलाही विसाव्या शतकात भारतात दाखल झाली. कोलकाता, मुंबई , पुणे यासारख्या शहरांमध्ये काही शिल्पं आणि पुतळे उभेही राहिले होते . पण तोपर्यंत महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठेही नव्हता. त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीमध्ये छत्रपती शाहू महाराजांना याची गरज वाटली. दुसरीकडे पहिल्या महायुद्धात इंग्रजांकडून लढणाऱ्या मराठी सैनिकांच्या पराक्रमाची गरज आणि ओळख इंग्रजांना नव्याने पटली होती. त्यामुळे इंग्रजांच्या युवराजाने पुतळ्याच्या भूमिपूजनाला यायचं मान्य केलं. ज्या इंग्रजांनी शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास लिहिला होता त्याच इंग्रजांचा युवराज आता छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक होणार होता .