एक्स्प्लोर
Pigeon Feeding Row: मुंबईत कबूतरांना दाणे टाकण्यावर निर्बंध, फक्त ४ ठिकाणी सकाळी ७ ते ९ परवानगी
मुंबईत कबूतरांना दाणे टाकण्याच्या वादग्रस्त मुद्द्यावर मुंबई महानगरपालिकेने (BMC) तात्पुरता तोडगा काढला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि तज्ञ समितीचा अहवाल येईपर्यंत ही अंतरिम व्यवस्था करण्यात आली असून, यानुसार शहरातील केवळ चार निश्चित ठिकाणीच कबूतरांना दाणे टाकण्यास परवानगी असेल. सकाळी ७ ते ९ या वेळेतच स्वयंसेवी संस्थांच्या (NGO) देखरेखीखाली हे करता येईल. या चार जागांमध्ये वरळी जलाशय, अंधेरीतील लोखंडवाला बॅक रोड, मुलुंडमधील जुना ऐरोली टोलनाका परिसर आणि बोरिवली पश्चिमेकडील गोराई मैदान यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, जुने कबुतरखाने बंदच राहणार असून, त्यांना उघडण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















