Mumbai Girgaon : Devendra Fadnavis यांच्या हस्ते श्री विद्या लक्षार्चन समारोहाचा समारोप
Mumbai Girgaon : Devendra Fadnavis यांच्या हस्ते श्री विद्या लक्षार्चन समारोहाचा समारोप
गिरगावातील ठाकूरद्वार येथील नेमाणी वाडीमध्ये युवा चेतना संस्थेतर्फे तीन दिवसीय श्री विद्या लक्षार्चन समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. भारताची प्रगती व्हावी आणि जगात शांती नांदावी, या उद्देशाने स्वामी अभिषेक ब्रह्मचारी यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा चेतनाचे राष्ट्रीय संयोजक रोहित कुमार सिंह यांनी हा समारोह आयोजित केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या समारोहाचा समारोप होणार असून दिवसभरात या सोहळ्याला महाराष्ट्र मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे सुद्धा उपस्थित असतील. या कार्यक्रमास काशी आणि देशातील प्रमुख संतांची उपस्थिती आहे.






















