Raj Thackeray :मनसे महायुतीत सहभागी होणार? अमित शाहांच्या घरी राज ठाकरे , फडणवीस , बावनकुळेंची बैठक
Raj Thackeray : राज ठाकरे दिल्लीत, मनसे महायुतीत सहभागी होणार? अमित शाहांच्या घरी राज ठाकरे , फडणवीस बावनकुळेंची बैठक
राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यातल्या सत्ताधारी महायुतीतला नवा घटक पक्ष बनण्याची शक्यता आहे.. मनसे अध्यक्ष राज ठाकरे राजधानी दिल्ली दौऱ्यावर आहेत... काही दिवसांपूर्वीच मनसे महायुतीमध्ये सामिल होणार आणि मनसेला १-२ जागा मिळतील अशी बातमी एबीपी माझाने प्रसारित केली होती या बातमीवर आता शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.. कारण आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि मनसे या दोन पक्षांमधल्या युतीच्या हालचालींना वेग आला आहे. त्यादृष्टीनं राज ठाकरेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक होणार आहे.भाजप कोअर कमिटीच्या संध्याकाळच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आधीच दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यापाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही दिल्लीला रवाना झाले आहेत.