एक्स्प्लोर

Satyajeet Tambe : '...तर आम्ही तुम्हाला आडवं आल्याशिवाय राहणार नाही'; सत्यजित तांबेंनी सुजय विखेंवर डागली तोफ

Satyajeet Tambe on Sujay Vikhe Patil : राजकारणात काम करताना पराभव पचवायला ताकद लागते. माझ्या राजकारणात अनेक पराभव मी पाहिले. पाच-पाच पराभव पचावलेला मी कार्यकर्ता असल्याचे सत्यजित तांबे यांनी म्हटले.

संगमनेर : भाजप नेते सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांच्या सभेत वसंत देशमुख (Vasant Deshmukh) यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या कन्या जयश्री थोरात (Jayashree Thorat) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर संगमनेरमध्ये (Sangamner) मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली. आता या प्रकरणावरून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी सुजय विखेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बाळासाहेब थोरात यांच्या प्रचार सभेतून ते बोलत होते. 

सत्यजीत तांबे म्हणाले की, ही संगमनेर तालुक्याच्या स्वाभिमानाची सभा आहे. एकमेकांच्या पायात पाय न घालण्याची परंपरा असलेला हा तालुका आहे. जाती, धर्म, भेद कधीही न समजलेला हा तालुका आहे.  मात्र गेल्या काही दिवसांपासून काही लोक येतात आणि आपल्या लोकांना डिवचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. 1999 पासून थोरात साहेबांच्या प्रचारासाठी मी काम करत आहे. पण आजपर्यंत इतक्या खालच्या पातळीच राजकारण मी कधीही पाहिलं नाही. पुढचे 50 वर्षे या तालुक्याकडे नजर उचलण्याची हिंमत होणार नाही, अशी ही निवडणूक होईल. 

मला खात्री आहे ते तुलना करणार नाही

आज जे म्हणतात चाळीस वर्षात काय झालं. त्यांनी 40 वर्षापूर्वीचा संगमनेर तालुका आणि आजचा संगमनेर तालुका पाहा. विकासाचं मॉडेल या तालुक्याने निर्माण केला आहे. काल लोणीच्या सभेत साहेबांनी सांगितलं की,  विकासाची तुलना करा. पण मला खात्री आहे ते तुलना करणार नाही. कारण त्यांच्याकडे दाखवण्यासारखं कुठलेच मॉडेल नाही, चालू संस्था बंद करण्याचं उत्तम मॉडेल म्हणजे ते प्रवरा मॉडेल आहे, असे म्हणत सत्यजित तांबे यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा साधला. 

त्यांना पराभव पचवता येत नाहीये

ते पुढे म्हणाले की, राजकारणात काम करताना पराभव पचवायला ताकद लागते. माझ्या राजकारणात अनेक पराभव मी पाहिले. पाच-पाच पराभव पचावलेला मी कार्यकर्ता आहे. त्यांना पराभव पचवता येत नाहीये आणि तो इतका जिव्हारी लागला की, काय करावं हे त्यांना सुचत नाही. या नैराश्यातून ते इथे येऊन बोलतात, भाषण करतात.  2007 ला सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य माझ्या बाजूने असताना तुमची आईच जिल्हा परिषद अध्यक्ष कशी झाली? आमदार तुमचेच, खासदार तुमचेच, केंद्रीय मंत्रीपद तुम्हाला. कोणतीच गोष्ट दुसऱ्याला द्यायची नाही. दुसरा काही करत असेल तर ते सहन करायचं नाही. या प्रवृत्तीला जागा दाखवण्याची वेळ आज आली आहे, असे म्हणत सत्यजित तांबे यांनी सुजय विखे पाटलांवर हल्लाबोल केला.  

...तर आम्ही तुम्हाला आडवं आल्याशिवाय राहणार नाही

जयश्रीच्या ठिकाणी दुसरी मुलगी असती तर घरात बसली असती. मात्र, ती बाहेर पडली खंबीर मन असलेली आमची जयश्री थोरात आहे. जे आमचे लोक घटनास्थळी नव्हते त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. साहेबांना फोन आले, भांडणं चालू आहे म्हणून आमचे प्रमुख पदाधिकारी गेले. भांडण मिटवायला ते गेले आणि तेच फोटो हे सगळे दाखवून आमच्यावर कारवाईची मागणी करतात. एकही माणूस दवाखान्यात ऍडमिट नाही आणि आमच्या कार्यकर्त्यांवर ३०७ चे गुन्हे दाखल करण्यात आले. आमच्या माता-भगिनींना गुन्हा दाखल करण्यासाठी आठ-आठ तास ठिय्या आंदोलन करावं लागलं आणि विरोधकांनी दिलेली तक्रार तात्काळ घेतली जाते. वसंत देशमुख दोन-दोन दिवस सापडत नाही आणि सापडल्यावर पंधरा मिनिटात जामीन मिळतो, असेही त्यांनी यावेळी म्हटले. जगा आणि जगू द्या, या तत्त्वावर काम करणारी आम्ही माणसं आहेत. तुम्ही जर आम्हाला आडवे आले तर आम्ही सुद्धा तुम्हाला आडवं आल्याशिवाय राहणार नाही, असेही सत्यजित तांबे यांनी म्हटले.  

आणखी वाचा 

Sujay Vikhe : संगमनेर विधानसभेतून पत्ता कट झाल्यानंतर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, प्रस्थापितांना मॅनेज...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report on Aaditya Thackeray : दिशाच्या वडिलांची याचिका, आदित्य ठाकरे अडचणीत येणार?Zero Hour : दिशा सालियनच्या कुटुंबावर दबाव?  आदित्य ठाकरे अडचणीत येणार?Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्टABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 18 February 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
Embed widget