(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Prakash Solanke आंदोलकांची प्रकाश सोळंके यांच्या घराबाहेर जाळपोळ, मराठा आंदोलकांनी गाड्याही जाळल्या
Maratha Reservation : Beed : बीडमधील (Beed) माजलगावमध्ये (Majalgaon) आक्रमक मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके (Ajit Pawar Group MLA Prakash Solanke) यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. तसेच, सोळंकेंच्या बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या गाड्याही मराठा आंदोलकांनी जाळल्या. प्रकाश सोळंकेंनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) याच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक झाले आणि याच्याच निषेधार्थ प्रकाश सोळंकेंच्या घरावर मराठा आंदोलकांनी दगडफेक केली.
सोशल माध्यमांवर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. एका मराठा आंदोलकानं अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंना फोन केला आणि मराठा आरक्षणाबाबत चर्चा सुरू केली. याच ऑडिओ क्लिपमध्ये बोलताना आमदार प्रकाश सोळंकेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं. याच्याच निषेधार्थ प्रकाश सोळंकेंच्या बंगल्यावर आक्रमक आंदोलकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. साधारणतः दीड तास आंदोलकांकडून आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक सुरू होती. आंदोलकांनी सोळंकेंच्या बंगल्याच्या आवारात असलेल्या गाड्याही जाळल्या. प्रकाश सोळंकेंच्या बंगल्यातून धुराचे लोळ येत असल्याचं पाहायला मिळत होतं. त्यावेळी आमदार प्रकाश सोळंके घरातच उपस्थित होते.