(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarange : मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केलं तर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे (Manoj Jarange Patil ) यांनी राज्य सरकारला (maharashtra government) डेडलाईन दिली आहे. ते म्हणाले की, "मी सकारात्मक आहे, जर निर्णय झाला नाही तर उद्या पाच वाजता मी माझा निर्णय घेईल." दरम्यान, मनोज जरांगे यांच्या मागण्याविषयी चर्चा करण्यासाठी आज राज्य सरकारचे शिष्टमंडळ येणार आहे.
मला भेटायला येणारे नेते मराठा म्हणून भेटायला येतायत, मी फक्त त्यांना समाजाचे प्रश्न सांगतो. मी सरकारसोबत चर्चेसाठी तयार आहे, पण आरक्षणाचा विषय तडीस नेणार आहे की नाही? हा प्रश्न महत्वाचा आहे.
अंमलबजावणीला 12-12 महिने लागतात का?
चर्चा करण्यासाठी कोण येणार मला माहित नाही? काल येणार होते पण आले नाहीत. ते अजून आलेच नाही ते आल्यानंतच चर्चा होईल. केव्हा येईल काय येईल मला माहित नाही, असे मनोज जरांगे म्हणाले. सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आमचे दरवाजे केव्हाही उघडे आहेत. आता आम्हाला आमच्या मागण्यांवर फक्त कारवाई हवी. अंमलबजावणीला 12-12 महिने लागतात का? असा सवालही यावेळी मनोज जरांगेंनी उपस्थित केला.